उमरखेड/ वसमत-रामु चव्हाण
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ संध्याताई सव्वालाखे यांच्या मान्यतेने, यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ वंदना ताई आवारी यांनी ही निवड अंतिम केली आहे. शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ सागर ताई शिंदे यांच्या निवडीने, शहर महिला काँग्रेसला नवा चेहरा मिळाला आहे. शहरातील महिलांचे पक्ष संघटन मजबूत करण्यासह काँग्रेसचे विचार व ध्येयधोरणे घराघरातील महिलांपर्यंत पोहोचविण्याची, मोठी जबाबदारी आता सागर ताई शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.उमरखेड महिला शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
Back to top button
Don`t copy text!