क्राईम स्टोरी

माळवटा पाटीवर 2 क्विंटल संशयित मांस जप्त; संतापलेल्या जमावाने तीन चाकी ऑटो पेटवला, वसमत ग्रामीण पोलिसांत कारवाई सुरू

रामु चव्हाण

माळवटा पाटी 2 क्विंटल संशयित मांस जप्त; संतापलेल्या जमावाने तीन चाकी ऑटो पेटवला, वसमत ग्रामीण पोलिसांत कारवाई सुरू

वसमतCT NEWS (विशेष बातमीदार):

तालुक्यातील माळवटा शिवारात संशयित गो-मांस वाहून नेणाऱ्या एका तीन चाकी ऑटोला स्थानिक नागरिकांनी पकडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या ऑटोमध्ये सुमारे 2 क्विंटल मांस आढळून आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आक्रमक झालेल्या जमावाने संबंधित ऑटो घटनास्थळीच जाळून टाकल्याचा संशय आहे

घ टनेचा संक्षिप्त तपशील:
ठिकाण: माळवटा शिवार सकाळी 6 वा सुमारास (तालुका वसमत)
जप्ती: अंदाजे 2 क्विंटल (200 किलो) संशयित गो-मांस
कारवाई: संतापलेल्या जमावाने वाहनाला लावली आग; वाहनाचे मोठे नुकसान
सध्याची स्थिती: वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची आणि पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक सपोनि उमाकांत पुणे ,पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डक ,सहा.पोलीस.उ.नि.मिरासे,भुरके , आरिफ दोसानी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. जप्त करण्यात आलेले मांस चाचणीसाठी पाठवण्यात येत असून, शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!