आपला जिल्हाक्राईम स्टोरी

वसमतमध्ये ३३ वर्षीय तरुणाची दगडाने डोके ठेचून हत्या; जुन्या पडीत रेस्ट हाऊसमध्ये आढळला मृतदेह

रामु चव्हाण

वसमतमध्ये ३३ वर्षीय तरुणाची दगडाने डोके ठेचून हत्या; जुन्या पडीत रेस्ट हाऊसमध्ये आढळला मृतदेह

वसमत / रामु चव्हाण

वसमत शहरात एका ३३ वर्षीय तरुणाची दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिजीत रत्नाकर शहाणे (वय ३३, रा. सुवर्णकार कॉलनी, मालेगाव रोड, वसमत) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेपासून ते दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी २.३५ वाजेपर्यंतच्या कालावधीत वसमत येथील एरिगेशन कॅम्प परिसरातील एका जुन्या पडीत रेस्ट हाऊसच्या खोलीत हा प्रकार घडला.
अज्ञात आरोपीने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून अभिजीत शहाणे यांच्या डोक्यात दगड मारून त्यांची हत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी संजय प्रभाकर टाक यांच्या फिर्यादीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 0585/2026, भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मिना,उपविभागीय पोलीस अधिकारी केंद्रे ,पोलीस निरीक्षक सुधीर वाघ,गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक भोसले ,सपोनि डेडवाल यानी
घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या गुन्ह्याचा तपास सुरू असून आरोपी अज्ञात आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!