वसमत / रामु चव्हाण
वसमत शहरात आज एक धक्कादायक घटना घडली असुन नांदेड रोडवरील बस स्थानक परिसरा जवळील पडक्या विश्रामगृहात एका 30 ते 32 वर्षे तरूणाच् मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मयताच्या डोक्यावर गंभीर आणि खोल जखमा आढळून आल्याने हा घातपाताचा म्हणजेच खुनाचा प्रकार असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ओळख पटवण्याचे आव्हान
मयत तरुणाचे वय अंदाजे ३० ते ३२ वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. तो वसमत स्थानिक आहे की बाहेरून आलेला, तसेच हा घातपात नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासण्यास सुरुवात केली आहे. शहर पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत शहर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
Back to top button
Don`t copy text!