हिंगोली / रामु चव्हाण
हिंगोली येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात संपन्न.

हिंगोली येथील विश्रामगृह येथे आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, बूथस्तरावरील संघटन बांधणी तसेच पक्षाचे विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस शिवसेना उपनेते तथा हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाप्रमुख अजय (गोपू) पाटील सावंत, जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, महिला जिल्हाप्रमुख रेणुकाताई पतंगे, सहसंपर्कप्रमुख विनायकराव भिसे, सहसंपर्कप्रमुख सुनील काळे, जिल्हासंघटक बाळासाहेब मगर, शेतकरी सेना प्रदेश संघटक वसीम देशमुख, उपजिल्हाप्रमुख गणेशराव शिंदे, प्रशासकीय उपजिल्हाप्रमुख उद्धवराव गायकवाड, उपजिल्हाप्रमुख जी. डी. काका मुळे, हिंगोली विधानसभा प्रमुख परमेश्वर मांडगे, उपजिल्हासंघटक सोपान पाटील, उपजिल्हासंघटक शंकरराव घुगे, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, आनंदराव जगताप, अनिल शिंदे, डॉ. पार्डीकर, संतोष देवकर, अल्पसंख्याक विभागाचे अलीम खतीब, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य गुड्डूभाऊ गोयंका, डॉ. मस्के सर, हिंगोली शहरप्रमुख रवी अण्णा पुपालू, औंढा शहरप्रमुख संजय भामिरगे, शहर संघटक चंदू उबाळे, विशाल यादव,तुषार जाधव तसेच सर्व उपतालुकाप्रमुख, सर्कलप्रमुख, उपसर्कलप्रमुख, शिवसेना पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी काळात पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवून प्रत्येक गाव व बूथ स्तरावर संघटना बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
Back to top button
Don`t copy text!