आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून उमाकांत पारधी यांचा महसुल दिनी सन्मान

मुख्य संपादक रामु चव्हाण

 

वसमत/ रामु चव्हाण

१ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिनाचे’ औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे मला *’उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी*’म्हणून सन्मानित करण्यात आले. सन्माननीय जिल्हाधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांच्या हस्ते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारताना मन कृतज्ञतेने भरून आले.
सन २०२५-२६ या वर्षभरात प्रशासनाच्या माध्यमातून आपण अनेक लोकोन्मुख कामे मार्गी लावली:
🏠 आदिवासी बांधवांना हक्काचे घर: ८० भिल्ल समाजातील कुटुंबांचे अतिक्रमण नियमाकूल करून त्यांना विनामूल्य घरकुलाचा मार्ग मोकळा करून दिला.
🌊 महापूर व्यवस्थापन: गोदावरी महापुरात २०,००० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर (कोणतीही जीवितहानी नाही).
🏕️ महासमाधान शिबिर: १८ शिबिरांच्या माध्यमातून ५०,००० पेक्षा जास्त लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजनांचा थेट लाभ.
⚖️ शेतकऱ्यांना न्याय: १०००+ शेतकऱ्यांच्या वाढीव मोबदल्याचा प्रश्न निकाली आणि ७५०+ महसुली प्रकरणांचा जलद निपटारा.
👴 ज्येष्ठ नागरिकांना आधार: पाल्यांनी बेदखल केलेल्या वृद्धांना न्याय मिळवून दिला.
🛣️ पाणंद रस्ते: अंबड व घनसावंगीमध्ये २,१२५ रस्त्यांची निश्चिती.
📋 पारदर्शक प्रशासन: विक्रमी वेळेत पोलीस पाटील भरती, १७,०००+ दाखल्यांचे वाटप आणि निवडणूक/जनगणना कार्यात राज्यात आघाडी.

हा प्रवास नक्कीच एकट्याचा नव्हता. या सर्व प्रवासात मला वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन करून पाठबळ देणाऱ्या सन्माननीय जिल्हाधिकारी आशिमा मित्तल मॅडम, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ सर आणि निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल सर यांच्याबद्दल मी विशेष कृतज्ञता व्यक्त करतो.
या यशाचे खरे श्रेय माझ्या उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयातील सर्व सहकारी, तसेच अंबड व घनसावंगी या दोन्ही तालुक्यांतील आमची संपूर्ण ‘फिल्ड टीम’ म्हणजेच दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार, सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल आणि पोलीस पाटील यांना जाते. त्यांच्या अहोरात्र मेहनतीमुळेच ही सर्व कामे शक्य झाली आहेत.
महसूल विभागासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विभागात काम करून थेट जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. हा सन्मान आपल्याला भविष्यात लोकसेवेसाठी आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा देईल! सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🙏✨
उमाकांत पारधी उपजिल्हाधिकारी

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!