वसमत तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या सात वाहनांवर तहसीलदार शारदाताई दळवी यांच्या पथकाने कारवाई करत सात वाहने जप्त केली आहेत.
वसमत तालुक्यात गेले अनेक महिन्यांपासून अवैध गौण खनिजांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात आहे. यामध्ये वाळू ,माती मोठ्या प्रमाणावर उपसा करून याची शहरात तसेच तालुक्यात राजेरोसपणे वाहतूक केली जात होती. यामुळे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ, वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांनी अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी विविध पथकांची स्थापना केली होती. या पथकाने कारवाई करत दिनांक 24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान वसमत उपविभागाअंतर्गत अवैध गौण खनिजाचे वाहतूक करणारे एक रेतीच्या टिप्पर, मातीचे वाहतूक करणारे दोन हायवा, गिट्टीचे वाहतूक करणारे तीन हायवा ,एक गीट्टीचे वाहतूक करणारे ट्रॅक्टर असे एकूण सात वाहन पकडण्यात आली असून त्यावर पोलीस तसेच महसूल विभागाच्या वतीनै कारवाई करण्यात आली आहे यामुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून येत्या काळामध्ये ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे तहसीलदार शारदाताई दळवी वसमत सि.टी.न्युजशी बोलताना सांगितले