आपला जिल्हा

वसमत: मोहगाव-फतेपूर पांदण रस्त्याचे काम निकृष्ट; संतप्त शेतकऱ्यांनी पाडले काम बंद

संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमत: मोहगाव-फतेपूर पांदण रस्त्याचे काम निकृष्ट; संतप्त शेतकऱ्यांनी पाडले काम बंद

 

वसमत CT NEWS

संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमत ( छाया नागेश चव्हाण)

वसमत तालुक्यातील मोहगाव तर्फे फतेपूर येथील ‘मातोश्री पांदण रस्ता’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामात संबंधित गुत्तेदार आणि इंजिनिअर यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्त्याच्या खोदकामातील काळी माती थेट रस्त्यावरच टाकली जात असल्याने हा रस्ता भविष्यात चिखलमय होण्याची भीती निर्माण झाली आहे. या प्रकाराला कंटाळून अखेर दोन्ही शिवारातील शेतकऱ्यांनी एकत्र येत आज हे काम थांबविले.

रात्रीच्या अंधारात काम उरकण्याचा प्रयत्न

शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपानुसार, संबंधित गुत्तेदार आणि इंजिनिअर हे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहेत. विशेष म्हणजे, शेतकरी सायंकाळी घरी गेल्यानंतर

रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने या रस्त्याचे काम केले जात आहे. निकृष्ट दर्जाचे काम लोकांच्या नजरेस पडू नये, यासाठीच हा घाट घातला जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांची मुख्य मागणी

काळी माती हटवा रस्त्याच्या खोदकामातून निघालेली काळी माती रस्त्यावर न टाकता ती बाजूला टाकण्यात यावी.

सहकार्याची तयारी दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांनी “आमच्या शेतातून रस्ता घ्या, पण तो दर्जेदार आणि पूर्ण करून द्या” अशी भूमिका घेतली आहे.

सध्या सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट असून, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

घटनास्थळी शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती

आज मोहगाव आणि फतेपूर शिवारातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून कामाची पाहणी केली. यामध्ये:

फतेपूर शिवार बेले, काशिनाथ नाईक, केशव नाईकवाडे, मल्लिकार्जुन, उमाजी, हनुमंत, अमरबिन चाऊस, शेवंतराव नाईकवाडे, सिद्धार्थ मोरे, विठ्ठल मोरे, लक्ष्मण मोरे, सूर्यकांत टाक, शेख इस्माईल, शेख आयुब, अशोक ढोणे.

मोहगाव शिवार विकास तांबोळी, संभाजी ढोणे, दशरथ ढोणे, नरेश टाक, भाऊराव जाधव, बालाजी जांभळे, मारुती माने, साहेबराव तांबोळी, काशीबा नाईक, पंडितराव ढोणे.

या सर्व शेतकऱ्यांनी संबंधित गुत्तेदार आणि इंजिनिअर यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने काम बंद पाडण्यात आले. आता या प्रकरणावर प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!