आपला जिल्हा

हिंगोली: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर जप्त, २० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वसमत CT

हिंगोली: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर जप्त, २० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वसमत / सि.टी.न्युज

जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरुद्ध पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) हट्टा पोलीस स्टेशनच्या हद्दीत धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला आहे. या कारवाईत एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. यावेळी पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, ‘चिखली फाटा’ परिसरातून एक टिप्पर अवैधरित्या वाळूची चोरी करून ती विक्री करण्यासाठी घेऊन जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित टिप्पर अडवला.
चालकासह मालकावर गुन्हा दाखल
पोलिसांनी टिप्परची पाहणी केली असता, त्यात अवैध रेती मिळून आली. यावेळी चालक संतोष नरवाडे (वय ३५ वर्ष, रा. ढवुळगाव) याच्याकडे वाळू वाहतुकीबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. मालक उद्धव जगताप याच्या सांगण्यावरून ही अवैध वाहतूक सुरू असल्याचे चालकाने कबूल केले.
या प्रकरणी चालक आणि मालक या दोघांविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत एम.एच. ३८ एक्स ६६११ क्रमांकाचा टिप्पर आणि वाळू असा एकूण २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाचा इशारा
हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आणि अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही विशेष मोहीम राबवण्यात आली.
कारवाई करणारे पथक ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक मोहन भोसले (एलसीबी), पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, कर्मचारी विक्की कुंदनानी, आझम प्यारेवाले, विशाल खंडागळे, किशोर सावंत आणि पाईकराव मेजर यांच्या पथकाने केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!