आपला जिल्हा

हिंगोली पोलीस दलाची मोठी झेप; CCTNS कामगिरीत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक

संपादक हरनामसिंग चव्हाण

हिंगोली पोलीस दलाची मोठी झेप; CCTNS कामगिरीत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक

वसमत CT NEWS

गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली (CCTNS) अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. फेब्रुवारी २०२६ च्या मूल्यमापनात हिंगोलीने २०१ पैकी २०१ गुण मिळवून १००% कामगिरीसह अव्वल स्थान गाठले आहे.
सप्टेंबर २०१५ पासून महाराष्ट्र राज्यात CCTNS ही ऑनलाइन कार्यप्रणाली कार्यान्वित आहे. या प्रणालीद्वारे तक्रार नोंदवण्यापासून ते गुन्ह्याचा तपास आणि आरोपींचा पूर्व इतिहास तपासण्यापर्यंतची सर्व कामे ऑनलाइन केली जातात. यामुळे पोलीस दलाच्या कामकाजात पारदर्शकता आणि वेग आला आहे.
यशाचे प्रमुख शिलेदार
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी कमलेश मीना यांच्या नियोजनामुळे हे यश साध्य झाले आहे. जिल्हा स्तरावर सीसीटीएनएस शाखेचे राजु पांडुरंग हमाने, राहुल तडकसे आणि पूजा जाधव यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या अंमलदारांना वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले.
असे मिळाले यश
पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (CID) दर महिन्याला राज्यातील ५३ पोलीस घटकांच्या कामकाजाचा आढावा घेतला जातो. हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, देखरेख अधिकारी आणि पर्यवेक्षक यांनी दिलेल्या वेळेत आणि अचूकपणे ऑनलाइन डेटा फीड केल्यामुळे जिल्ह्याला पूर्ण गुण मिळाले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह जिल्ह्यातील केशव पुंड, सुमन काळे, राम धुमाळ, गजानन शिंदे यांसारख्या अनेक अंमलदारांच्या सांघिक प्रयत्नांमुळे हिंगोली जिल्हा आज राज्यात ‘नंबर वन’ ठरला आहे.
हिंगोली पोलीस दलाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, हिंगोली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!