पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांनी इंधन बचतीचं आवाहन करत स्वतःच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली, तर मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दुचाकीवरून प्रवास करत साधेपणा आणि जबाबदारीचा आदर्श घालून दिला..
इंधन बचत आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर ही केवळ गरज नसून आजची सामूहिक जबाबदारी आहे, ही भावना अधिक दृढ होते आहे..
याच विचारातून, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत रेल्वेने प्रवास करण्याचा एक छोटासा प्रयत्न वसमत विधान सभेचे भाजपाचे नेते अतिष दांडेगावकर यांनी केला.. देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाढत्या इंधन खर्चाचा ताण आणि जागतिक परिस्थिती लक्षात घेता, प्रत्येकाने आपल्या पातळीवर जबाबदारी स्वीकारणं आवश्यक आहे असे मत त्यानी बोलून दाखवले.
लहान वाटणाऱ्या अशा कृतीतूनच मोठा बदल घडू शकतो आणि देशहितासाठी योगदान देता येतं, हा विश्वास आहे.देश हितासाठी त आपणही एक पाऊल उचलावं ही माझी मनापासून विनंती आहे.. ज्यांना शक्य आहे त्यांनी वाहनांचा वापर कमी करावा, आवश्यक तिथे वापरणे गरजेचे असते परंतु अनावश्यक वापर हा कमी करता येतो.. सरकारी वाहन आणि वाहतुकीच्या सुविधांचा वापर करावा.. आपले राष्ट्र सक्षम करण्यासाठी, संकटांपासून देशाला वाजवण्यासाठी एवढी आपण निश्चित करू शकतो.असे आवाहन ही अतिष दांडेगावकर यांनी वसमत सि.टी.न्यूज शी बोलताना सांगतिले.