आपला जिल्हाताज्या घडामोडी

वसमतमध्ये डिझेलचा तीव्र तुटवडा: नायरा पेट्रोल पंपावर वाहनांच्या आणि कॅनच्या,अर्धा किलो मीटरपर्यंत रांगा, महामार्गावर वाहतूक कोंडी!

संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमतमध्ये डिझेलचा तीव्र तुडवडा: नायरा पेट्रोल पंपावर वाहनांच्या आणि कॅनच्या,अर्धा किलो मीटरपर्यंत रांगा, महामार्गावर वाहतूक कोंडी!

वसमत CT NEWS
संपादक हरनामसिंग चव्हाण

 

वसमत शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून डिझेलचा तीव्र तुडवडा निर्माण झाला आहे. परिसरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंप कोरडे पडले असल्याने वाहनधारकांची एकच तारांबळ उडाली आहे. सध्या केवळ एका ‘नायरा’ पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध असल्याने, संपूर्ण वसमत परिसरातील वाहनधारकांनी या पंपावर एकच गर्दी केली आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, पंपापासून थेट नॅशनल हायवेपर्यंत वाहनांच्या किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
महामार्गावर शेकडो वाहनांची ‘लाईन’; वाहतूक प्रभावित
नायरा पेट्रोल पंपापासून ते थेट राष्ट्रीय महामार्गापर्यंत रस्त्याच्या एका बाजूने हायवा, अवजड ट्रक, कार, ट्रॅक्टर आणि दुचाकी अशा शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. डिझेल मिळवण्यासाठी वाहनधारक तासनतास ताटकळत उभे आहेत. महामार्गाचा एक पदर पूर्णपणे वाहनांच्या रांगेने व्यापल्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असून, अपघाताची भीतीही व्यक्त केली जात आहे.
डिझेलसाठी ‘कॅन’ आणि ‘डब्यांची’ लागली रांग!
वाहनांशिवाय शेतकरी आणि इतर डिझेल ग्राहकांनी पंपापासून ते थेट रस्त्यापर्यंत शेकडो रिकामे डबे आणि कॅन (केणी) रांगेत लावले आहेत. पंपाच्या आवारात पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिलेली नाही. डिझेल कधी संपेल या भीतीने नागरिक प्रचंड आक्रमक आणि चिंतेत दिसत आहेत.
नागरिकांचा संताप”शहरातील सर्व पंप बंद आहेत. शेतीच्या कामासाठी आणि वाहतुकीसाठी डिझेल अत्यावश्यक आहे, पण इथे तासनतास थांबूनही नंबर येईल की नाही याची शाश्वती नाही. प्रशासनाने या तुडवड्याक डे तातडीने लक्ष द्यावे.”
शेतकरी आणि वाहतूकदार अडचणीत
सध्या शेती कामांची लगबग आणि मालवाहतुकीचा हंगाम सुरू असतानाच डिझेलचा हा तुडवडा निर्माण झाल्याने शेतकरी आणि ट्रॅक्टरचालक पुरते हवालदिल झाले आहेत. वसमतमधील इतर पंपांवर डिझेलचा पुरवठा कधी सुरळीत होणार?
आणि नागरिकांना या त्रासातून कधी मुक्ती मिळणार?
असा संतप्त सवाल आता वाहनधारकांकडून विचारला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!