वसमत तहसील कार्यालयाचा कारभार गतिमान होणार; नवनवीन तहसीलदार श्री. नन्नवरे साहेब यांनी स्वीकारला पदभार!
संपादक हरनामसिंग चव्हाण

ब्रेकिंग न्यूज
वसमत तहसील कार्यालयाचा कारभार गतिमान होणार; नवनवीन तहसीलदार श्री. नन्नवरे साहेब यांनी स्वीकारला पदभार!
वसमत (CT NEWS ):संपादक हरणामसिंग चव्हाण
वसमत शहरातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. येथील तहसील कार्यालयात नवनियुक्त तहसीलदार श्री. नन्नवरे साहेब यांनी आपल्या पदाचा प्रोफेशनल चार्ज (अधिकृत पदभार) स्वीकारला असून, त्यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली आहे.
तहसील कार्यालयात रुजू झाल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे शासकीय नियमांनुसार स्वागत केले.
प्रशासनाला मिळणार गती
श्री. नन्नवरे साहेब यांच्या नियुक्तीमुळे वसमत तालुक्यातील महसूल विभागाच्या कामांना अधिक गती मिळणार आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न, शेतकरी बांधवांचे प्रलंबित प्रश्न आणि स्थानिक प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने मार्गी लागेल, अशी आशा आता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर तालुक्यातील विविध स्तरांतून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.


