आपला जिल्हा

वसमतकरांना खड्ड्यांतून दिलासा! आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या दणक्यानंतर हायवेच्या कामाला अखेर सुरुवात

संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमतकरांना खड्ड्यांतून दिलासा! आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या दणक्यानंतर हायवेच्या कामाला अखेर सुरुवात

वसमत CT NEWS

वसमत:
शहरात प्रवेश करणाऱ्या नॅशनल हायवेच्या अत्यंत दुरवस्थेमुळे नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत होते. या समस्येची गंभीर दखल घेत आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि आक्रमक पवित्र्यामुळे अखेर या रस्त्याच्या कामाला धडाक्यात सुरुवात झाली आहे. आज आमदार नवघरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामाची पाहणी केली आणि कंत्राटदाराला दर्जात्मक कामाबाबत कडक सूचना दिल्या.
…आणि आमदारांचा फोन खणखणला; अधिकारी-कंत्राटदार ताकास तूर लागेना!
दादऱ्यापासून ते मोठ्या कॅनॉल पुलापर्यंतचा रस्ता इतका खराब झाला होता की, येथून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले होते. शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि शहरात येणाऱ्या पाहुण्यांना या खड्ड्यांमुळे नाहक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता.
नागरिकांची हीच अडचण ओळखून आमदार राजूभैय्या नवघरे यांनी संबंधित अधिकारी आणि गुत्तेदार (कंत्राटदार) यांना फोनवरून चांगलाच ‘राजूभैय्या स्टाईल’ झाप दिला. आमदारांच्या या रुद्रावतारानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली आणि तात्काळ आजपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

“जनतेचा त्रास मी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. दादऱ्यापासून कॅनॉल पुलापर्यंतच्या रस्त्यामुळे लोक हैराण झाले होते. कंत्राटदाराला कडक शब्दांत तंबी दिली आहे. काम वेळेत आणि दर्जेदार झालेच पाहिजे, यात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.”
— आमदार राजूभैय्या नवघरे

नागरिकांकडून ‘भैय्या’चे आभार!
रस्त्याचे काम सुरू झाल्याचे पाहताच या मार्गावरून ये-जा करणाऱ्या शेकडो प्रवासी, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. कित्येक दिवसांच्या नरकयातनेतून आणि खड्ड्यांच्या त्रासातून सुटका केल्याबद्दल संपूर्ण वसमतकरांनी आमदार राजूभैय्या नवघरे यांचे मनापासून आभार मानले आहेत. ‘लोकनेता असावा तर असा!’ अशा प्रतिक्रिया सध्या मतदारसंघातून उमटत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!