आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

वसमत येथे कोविड विशेष लसीकरण शिबिरास अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची दांडी

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

       वसमत शहरामध्ये कोविड विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहे .याबाबत मा. जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय हिंगोली यांनी त्याबाबतचे आदेश काढून दिनांक 21 नोव्हेंबर 2021 व दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रविवार या दिवशी वसमत शहरात विविध ठिकाणी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करून जास्तीत जास्त लसीकरण करावे यावर भर देण्याबाबतचे आदेश निर्गमित केले होते. या आदेशाला वसमत उपजिल्हा रुग्णालय व आरोग्य कर्मचारी अधिकारी यांनी हरताळ फासले असून अनेक ठिकाणचे कोविड लसीकरण केंद्र आज बंद ठेवून कर्मचारी यांनी दांडी मारली असल्याचे पहावयास मिळाले. आज रविवार असल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवून चक्क सुट्टी एन्जॉय करण्यात मध्येच कर्मचारी व्यस्त असल्याचे पहावयास मिळाले. याबाबत वसमत सिटी न्यूज ने एकूण 14 ठिकाणी सुरू असलेल्या लसीकरण केंद्रास भेट दिली असता अनेक केंद्र बंद होते याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चिलकेवार यांना विचारले असता त्यांनी फोन उचलण्यास टाळाटाळ केली तर काही वेळानंतर फोन करून चार पाच ठिकाणी केंद्र सुरू आहेत व ज्या ठिकाणी केंद्र बंद आहेत अशा ठिकाणी गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले व परत न दोन तासांनी फोन करून काही कर्मचाऱ्यांनी रविवारी काम करणार नसल्याचे लेखी कळवले असल्याचे डॉक्टर चिलकेवार यांनी सांगितले .एकूण वसमत शहरामध्ये 14 ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आदेश दिलेले असताना एकूण सहा केंद्रावर विशेष लसीकरण शिबिर आयोजित केल्याचे दिसून आले उर्वरित केंद्र मात्र बंद असल्याने नागरिक चकरा मारून हैराण झाले तर या कोवीड विशेष लसीकरण शिबिरास वैद्यकीय अधिकारी नर्स संगणक ऑपरेटर शिक्षक आशा वर्कर व अंगणवाडी सेविका या सर्वांनी शिबिर च्या ठिकाणी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत हजर राहण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे आदेश असतानासुद्धा सदरील कर्मचाऱ्यांनी या लसीकरण सतरास दांडी मारल्याने यावर कारवाई होणे अपेक्षित आहे .
यामुळे या दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का हे आता पहावे लागणार आहे.

 

आज बंद असलेले लसीकरण केंद्रे खालीलप्रमाणे होती

🧩प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र शुक्रवार पेठ वसमत
🧩बहिर्जी विद्यालय वसमत
🧩 महात्मा फुले विद्यालय बसमत
🧩नुरानी फंक्शन हॉल वसमत
🧩 सरस्वती मंदिर वसमत
🧩गणपती मंदिर गणेश पेठ वसमत
🧩श्री शिवदासजी बोड्डेवार यांचे निवासस्थान सोमवार पेठ वसमत
🧩डॉक्टर अनिल जिंतुरकर यांचा दवाखाना सत्याग्रह चौक वसमत
🧩डाॅ गफार अली यांचा दवाखाना मामा चौक वसमत
या ठिकाणी सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर एकही कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे सदरील केंद्र बंद होते

तर एकूण पाच केंद्र सुरू होते यामध्ये

🥌 उपजिल्हा रुग्णालय वसमत
🥌अहिल्यादेवी होळकर विद्यालय वसमत
🥌श्री सिद्धेश्वर विद्यालय वसमत
🥌डॉक्टर अब्दुल बशिद यांचा दवाखाना रविवार पेठ वसमत


🥌 डॉक्टर पवार यांचा दवाखाना काळकाई मंदिर जवळ वसमत हे पाचच केंद्र सुरू होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!