वसमत येथील ज्येष्ठ विधी तज्ञ अॅड प्रभा कात्नेश्वरकर यांचा नातू संभाजीनगर येथील उच्च न्यायालयातील विधीतज्ञ अॅड शैलेश कात्नेश्वरकर यांचा मुलगा देवेश कात्नेश्वरकरने या अगोदर बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघातर्फे सुवर्णपदक पटकावून आपली चुनुक दाखवून दिली होती. त्याच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन झाले होते.तसेच त्याच्या या कार्याबद्दल चंदीगड येथे पार पडलेल्या पात्रता फेरीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शनी केल्यामुळे सप्टेंबर 2022 बँकॉक येथे होणाऱ्या एशियन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप या स्पर्धेत भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी वसमतच्या भुमीपुुुुत्र देवेश शैलेश कात्नेश्वरकर यांना मिळाल्यामुळे वसमत चे नाव संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर चमकविल्याने वसमतची अभिमानाची बाबा असून वसमतकरान तर्फे देवेश ची खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा.