
हिंगोली : रामु चव्हाण
निराधार, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध, मनोरुग्णांची अविरत सेवा करणाऱ्या जालना येथील अंजानी फाऊंडेशन ला पुणे येथील _वुमन इंटरप्रेनर प्रायव्हेट लिमिटेड_ च्या वतीने “`NGO Brand of the year 2022“` पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शनिवारी ( दि.7 मे ) पुणे येथील हॉटेल रेडिसन ब्लु खराडी आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. सद्या संपुर्ण महाराष्ट्रभर कायदा व सुव्यस्थेचा बंदोबस्त असल्याने मी स्वत: पुरस्कार स्विकारण्यासाठी जाऊ शकलो नाही. अविरत समाज कार्यात अग्रेसर असलेल्या फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योती आडेकर मॅडम व सचिव विद्या जाधव यांचे हस्ते हा पुरस्कार स्विकारला…
पुणे येथे पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रमुख पाहुणे बॉलिवूड अभनेत्री झोया अफरोज ह्या होत्या तर संयोजक, वुमन इंटरप्रेनर प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक हरीश सोनी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृन्दा भंडारी यांनी केले.
अंजानी फाऊंडेशनचे संस्थापक बालाजी किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली फाऊंडेशनच्या माध्यमातून अध्यक्षा ज्योती आडेकर, सचिव विद्या जाधव, उपाध्यक्ष Adv. शारदा ठोंबरे, कोषाध्यक्ष डॉ.अर्जुन वाहुळे, विजय जाधव व अंजानी फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी यांच्या मदतीने निराधार, वयोवृद्ध, दिव्यांग, मनोरुग्णांची सेवा करण्याचे कार्य अविरत सुरू आहे. यामध्ये अन्न, वस्त्र वाटप यासारख्या मूलभूत गरजांची उपलब्धता करून दिली जाते. फाऊंडेशनच्या वतीने गरजूंना मासिक अन्नधान्य किराणा किट वाटप, कपड्यांचे वाटप, आरोग्यवर्धक औषधं तसेच फूड पॅकेट वाटप केले जाते. रस्त्यावरील निराधार लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येते . हे काम या संस्थेच्या वतीने हिवाळी उपक्रम, पावसाळी उपक्रम, उन्हाळी आणि दिवाळी उपक्रम अशा पद्धतीने विविध उपक्रम राबविले जातात. यासाठी फाऊंडेशनला पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले, सहा.पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे मॅडम यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. दरम्यान, अंजानी फाऊंडेशनच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन _वुमन इंटरप्रेनर प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने हा पुरस्कार देऊन संस्थेचा सन्मान केला_ आहे. या पुरस्काराबद्दल संस्थेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.