विश्व हिंदू परिषदेतर्फे 13 ऑक्टोबर शुक्रवारी वसमत तेथून छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण रथयात्रा निघणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष गणेशराव काळे यांनी दिली आहे.
वसमत येथे विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने 13 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण रथयात्रा निघणार असून ही रथयात्रा शुक्रवारी दुपारी 1 वा वसमत शहरातील शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून शहरातील मुख्य मार्गाने निघणार आहे. या शौर्य जागरण रथयात्रेत परमपूज्य वेदांतचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज, परमपूज्य श्री गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज, श्री राजू महाराज बोरजेकर, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज शिवनीकर त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून कृष्णाजी देशमुख विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत हे राहणार आहेत .
तसेच प्रमुख मार्गातून ही शौर्य जागरण रथयात्रा चा समारोप सायंकाळी जिल्हा परिषद मैदान वसमत येथे शिवशाहीर तसेच महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त शिवशाहीर सुरेश जाधव आणि यशवंत जाधव यांच्या कार्यक्रमाने जिल्हा परिषद मैदान येथे सायंकाळी सहा वाजता ठेवण्यात आला आहे तरी जास्तीत जास्त संख्येने छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण रथ यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने तालुका अध्यक्ष गणेश राव काळे यांनी केले आहे.