
वसमत / रामु चव्हाण
वसमत शहरातील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरा जवळी माॅ तुळजाभवानी नवरात्र महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध हरिभक्त परायण यांचे भागवत ,कीर्तन ,भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे .
यामध्ये हरिभक्त परायण शरद महाराज अंबेकर, भगवान महाराज शेंद्रेकर, अमोघ महाराज ,गंगाधर महाराज बोराळकर ,अवधूत महाराज टाकळीकर यांच्यासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान मा तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाच्या वतीने करण्यात आले आहे या मंडळाचे अध्यक्ष नारायण गाडे व पदाधिकारी गणेश दशरथे ,सचिन गोरे ,आकाश गोरे ,संतोष हजारे ,प्रसाद जोगेवार ,उत्तम गोरे ,आनंद माने यांच्या सह सर्व सिद्धिविनायक मित्र मंडळ शहर पेठ वसमत यांच्यावतीने करण्यात आहे