आपला जिल्हा

वसमत येथे ‘राष्ट्रीय डॉक्टर दिना’निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न; ३० दात्यांनी केले रक्तदान!

संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमत येथे ‘राष्ट्रीय डॉक्टर दिना’निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न; ३० दात्यांनी केले रक्तदान!

वसमत CT NEWS :
आज दि. १ जुलै २०२६ रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ चे औचित्य साधून वसमत येथे एका स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर असोसिएशन, वसमत यांच्या वतीने आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटी ब्लड बँक, नांदेड यांच्या संयुक्त सहकार्याने या भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
हे रक्तदान शिबिर वसमत येथील मोंढा परिसरातील काबरा कॉम्प्लेक्स येथे पार पडले. या शिबिराला नागरिकांचा आणि तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यामध्ये एकूण ३० जणांनी आपले रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
या संपूर्ण कार्यक्रमास आणि शिबिराच्या यशस्वितेसाठी शहरातील नामांकित डॉक्टर्स आणि कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य व योगदान दिले. यामध्ये प्रामुख्याने:
डॉ. पदमवार,डॉ. डिग्रसे, डॉ. सेलुकर,डॉ. संजय सोमकवार,डॉ. प्रविण सोमकवार
,डॉ. भोसले
,डॉ. संघई
,डॉ. मारडे
,डॉ. मयुर सालपुते
,डॉ. धोत्रे
,डॉ. चव्हाण
, डॉ. कोंडावार
, श्री. शिरीष अग्रवाल
, श्री. शिवाजी कदम
, श्री. मनीष काबरा
या सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून शिबिराचे उत्तम नियोजन केले व परिश्रम घेतले. राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल डॉक्टर असोसिएशन, वसमतचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!