वसमत/ रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील टेंभुर्णी गावातील येशू बाबा मंदिराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत एका बाभळीच्या झाडाखाली दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गावातील काही लोक तिरट नावाचा जुगार खेळून त्यावर पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाली यावरून पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकत सहा आरोपीतांना ताब्यात घेतले आहे तसेच त्यांच्याकडून तीन हजार 850 रुपये नगदी व जुगाराचे साहित्य, तीन मोटरसायकल असा एकूण 1 लाख 63 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरील कारवाई हट्टा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के,पोलीस कर्मचारी लोखंडे ,लेकुळे,सिद्दीकी, यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
Back to top button
Don`t copy text!