वसमत/ रामु चव्हाण
कुरूंदा पोलिस स्टेशन येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदानाचा कार्यक्रम घेण्यात येतो .
यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठय़ा उत्सवात महाराष्ट्रात साजरी झाली. तसेच कुरूंदा येथे देखील सामाजिक उपक्रम राबवित शिवराय मनामनात शिवजयंती घराघरांत या म्हणीप्रमाणे तसेच कुरूंदा येथे इतर सामाजिक कार्यक्रम करून साजरी करण्यात आली होती .आणि आता त्याच निमित्त याही वर्षी पोलिस स्टेशन कुरूंदा येथे रक्तदान हे श्रेष्ठदान उक्तीप्रमाणे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे .तरी सदर रक्तदानास पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सर्व तरुणांनी रक्तदान करून सहभाग नोंदवावा असे आवाहन ठाण्याचे ठाणेदार सुनील गोपीनवार यांनी केले आहे .सदर कार्यक्रमाचे उद्घाटन उद्घाटनप्रसंगी हिंगोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश कलासागर हे उपस्थित राहणार आहेत.
Back to top button
Don`t copy text!