ताज्या घडामोडी

लाल बहादूर शास्त्री विद्यालयात स्वातंत्र्य मोहत्सव मोठ्या उत्साहात साजरा

रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण


आज लाल बहादूर शास्त्री विद्यालयात स्वांतत्र्याचा सुवर्ण मोहत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला… यावेळी संस्थेचे अध्यक्ष बालाजी चव्हाण सर,जगदीश चव्हाण सर हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डाँ.मुलगिर सर (डेंटिस्ट)
हे लाभले त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक आसाराम दुधाटे सर व सेमी माध्यमाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गोंगे मँडम यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषभ सोनी (इयत्ता ९वी) व वेदिका चापके (इयत्ता ७ वी )या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाची सुरवात स्वागत गिताने करण्यात आली व “हा देश माझा..”हे गीत सादर केले त्यासाठी खैरे सर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर चिमुकल्यांची भाषणे झाल्यानंतर देशभक्ती पर गितावर न्रत्य सादर करण्यात आले त्यासाठी प्रमोद डोंबे सर यांनी विशेष मार्गदर्शन केले.

“अनेकता मे एकता” हि एकांकिका विद्यार्थ्यांनी सादर केली त्यासाठी शामा गरुडकर मँडम यांनी मार्गदर्शन केले. भारताच्या महान नेत्यांच्या भुमीकाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डाँ.मुलगिर सर व शाळेचे अध्यक्ष संदिप चव्हाण सर यांनी मार्गदर्शन पर भाषण केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंकिता हरबयासी मँडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!