ताज्या घडामोडी

मराठी अस्मिता कोचिंग क्लासेस आयोजित महापरीक्षेचे आज बक्षिस वितरण

रामु चव्हाण

वसमत/ रामू चव्हाण

“मराठी अस्मिता” कोचिंग क्लासेस आयोजित महापरीक्षा -2023 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा…!
तसेच क्लासेसला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दशकपूर्ती सोहळ्याचे आयोजन…!

याही वर्षी 310 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा होणार सत्कार..!
क्लासेसचे मागील 10 वर्षातील आजी- माजी विद्यार्थी येणार एकत्र…!

वसमत : वसमत शहरातील “मराठी अस्मिता” कोचिंग क्लासेस आयोजित महापरीक्षा 2023 या जिल्हास्तरीय स्पर्धेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा तसेच क्लासेसला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दशकपूर्ती सोहळा आयोजित केला आहे.

दिनांक 9 जुलै (रविवार) रोजी म. बसवेश्वर मंगल कार्यालय येथे दुपारी 12.30 वाजता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सत्कार सोहळ्याचे वैशिष्ठ म्हणजे विद्यार्थ्यांचे “आजी-आजोबा” हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, तरी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आजी- माजी विद्यार्थी- पालक यानी उपस्थिती रहावे, असे आवाहन “मराठी अस्मिता” कोचिंग क्लासेसचे संचालक श्री महेश जोशी (मरसुळकर) यांनी केले आहे..

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!