
वसमत/ रामु चव्हाण
प्रसार माध्यमांना विनंती माझ्या बद्दल कोणत्याही गैरसमज पसरू नका..खा.हेमंत पाटील
शिवसेनापक्ष प्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी शिवसेना खासदारांची आज बैठक बोलावली होती. या बैठकीला मी वेळेत उपस्थितीत राहू शकलो नाही. कारण मी गेल्या 16 वर्षापासून नांदेड मध्ये मा. शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आषाढी महोत्सवाचे आयोजन करत आहे.रविवारी (ता.10) नांदेडमध्ये आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रात्री उशिरा संपला. त्यामुळे मातोश्रीवर बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीस पोहचण्यास थोडासा वेळ झाला.पण प्रसार माध्यमात उलट सुलट चर्चा झाल्या माझ्या बद्दल अफवा पसरवल्या गेल्या. तरी माध्यमांना माझी विनंती आहे की माझ्या बद्दल कोणत्याही अफवा पसरू नका. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भात पक्ष प्रमुख जो निर्णय देतील तो मला मान्य आहे…!!