वसमत नगर परिषदेचा तुघलकी कारभार…शिवजयंतीचे बॅनर हटवले
रामु चव्हाण

वसमत नगर परिषदेचा तुघलकी कारभार…शिवजयंतीचे बॅनर हटवले
वसमत मध्ये विना परवाना असलेले बॅनरवर कारवाई कधी
वसमत : रामु चव्हाण
वसमत नगर परिषदेचा तुघलकी कारभार सध्या पहावयास मिळत आहे. वसमत येथे 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते त्यानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर वसमत शहरात मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले होते. तर 19 फेब्रुवारी शिवजयंतीचा रात्रीच नगरपरिषदेने सदरील बॅनर तात्काळ काढले. त्याचप्रमाणे वसमत शहरात गेली अनेक वर्षांपासून सार्वजनिक शिवजयंती महोत्सव हा साजरा करण्यात येतो यानिमित्त राष्ट्रीय प्रबोधनकार राजा शिवछत्रपती पुरस्कार हा दरवर्षी प्रदान करण्यात येतो त्यानिमित्त कार्यक्रम जागृतीसाठी विविध ठिकाणी बॅनर लावण्यात येतात हा कार्यक्रम दिनांक 28 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद मैदानावर होणार असून या कार्यक्रमाचे बॅनर नगर परिषदेने कार्यक्रमाच्या एक दिवसापूर्वीच काढले तर वसमत शहरात खाजगी शाळा ,कोचिंग क्लासेस, राजकीय पुढारी यांचे वाढदिवस व्यवसायाची जाहिरात करणारे बॅनर असे शेकडो बॅनर विनापरवाना शहरात असताना फक्त शिवजयंतीचे बॅनर वर कारवाई का करण्यात आली असा सवाल शिवप्रेमी विचारत आहेत. सदरील कारवाई कुणाचा आदेशाने झाली व का करण्यात आली महामानवाचा कार्यक्रमाचा बॅनरवर कारवाई तर शहरातील इतराना वेगळा वागणूक नगर परिषद देत आहे का ?
यामुळे शहरात रोज शेकडो बॅनर विनापरवाना लागत आहेत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पायमल्ली नगरपरिषद वसमत करत आहे का कारण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बॅनर लावण्यासाठी घेण्यात येणारी परवानगी नगर परिषदेकडे किती आली आणि शहरात आज घडीला अंदाजे शंभराचा च्या जवळपास बॅनर आहेत आणि या बॅनर वर एकाही नगरपरिषदेच्या परवानाच्या क्रमांक नाही त्यामुळे या बॅनर कारवाई करण्याऐवजी शिवजयंतीच्या बॅनर कारवाई का करण्यात येत आहे असा संतप्त सवाल शिवप्रेमी विचारत आहेत यामुळे नगरपरिषदेचा तुघलकी कारभार पहावयास मिळत असून याकडे नागरिक संतप्त भावनेने पाहत आहेत.