कलकत्ता येथील वैद्यकीय महाविद्यालयात एका डॉक्टर मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, त्या घटनेच्या विरोधात व त्या मुली वर झालेल्या अन्यायाच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी, तसेच या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर कडक शिउक्षा व्हावी यासाठी देशभरातील सर्व डॉक्टर्स च्या वतीने उद्या दि १७ ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात आला आहे.
त्यामुळे सर्व देशभरातील दवाखाने दि १७ ऑगस्ट सकाळी ६ वाजल्या पासून दि १८ ऑगस्ट सकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहतील याची सर्व रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी नोंद घ्यावी व सहकार्य असे आवाहन वसमत डाॅक्टर असोसिएशन तर्फे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे