
वसमत /
आज दि.०३/०१/२०२३ रोज मंगळवार लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बालिकादीन मोठ्या उत्साहात साजरा केला.
सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेत येऊन मुलींनी त्यांच्या जीवनचरित्रावर भाषणे केली. यावेळी शाळेचे अध्यक्ष संदिप चव्हाण सर,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापक आसाराम दुधाटे सर, सेमी माध्यमाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गोंगे मँडम,प्रि-प्रायमरी विभाग प्रमुख दुर्गाताई ढेपे मँडम व शाळेचे समन्वयक संदिप चाटोरीकर सर हे उपस्थित होते. सर्व महिला शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन अंकिता हरबयाशी मँडम, व सिमा जैस्वाल मँडम यांनी व सेमी माध्यमाचे विद्यार्थी वैभवी कमळू व चैतन्या गिरगांवकर यांनी केले, वैशाली मोगेकर मँडम व संतोष राऊत सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन सई भवर ह्या विद्यार्थिनी ने केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे अध्यक्ष , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.