वसमत तालुक्यातील शैक्षणिक संस्थेमध्ये अग्रगण्य नाव असलेल्या लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे संचालक संदीप चव्हाण यांना महाराष्ट्र बिजनेस क्लब यांच्या वतीने दिला जाणारा उद्योग तारा नामांकित पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र बिजनेस क्लब यांच्यावतीने उद्योग गर्जना 2023 या कार्यक्रमांमध्ये संदीप चव्हाण यांना उद्योग तारा हा नामांकित पुरस्कार देण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे वितरण दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार देण्यात येणार आहे.