शेत जमिनीची मोजणी करून देण्यासाठी 50 हजार रुपयाचे लाचेची मागणी करून ती स्वीकारताना दोन जणांना आज लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून पकडले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की वसमत तालुक्यातील एका शेतकऱ्याची शेत जमीन मोजमापासाठी ५० हजाराची लाच स्वीकारतांना भुमापकासह एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे, याप्रकरणी लाच स्वीकारणारणार्या वर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वसमत शहरातील उप अधिक्षक भुमीअभिलेख कार्यालयातील भुमापक मारोती घाटोळ,यांनी शेत जमीन मोजणीसाठी तक्रार दारा कडुन ५० हजाराची लाचेची मागणी केली होती लाचलुचपत विभागाने सर्व प्रकाराची तपासणी केली,३० जानेवारी रोजी दुपारी २.३० वा दरम्यानात बसस्थानक परिसरात भाजीपाला विक्री चा व्यवसाय करणारे चांदु भेदेवाड यांनी भुमापक यांच्या सांगण्यावरून तक्रार दार यांच्या कडुन ५० हजाराची लाच स्वीकारतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचत दोन जणास ताब्यात घेतले आहे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.