सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणाऱ्या वसमत तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील जगद्गुरू तुकाराम महाराज नागरी सहकरी पतसंस्था मर्या. वसमत जिल्हा हिंगोली ला सन २०२४ या वर्षाचा ‘बॅको ब्ल्यु रिबन पुरस्कार २०२४” चा जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार दिनांक २९, ३० व ३१ जानेवारी २०२५ रोजी आम्बी सिटी लोणावळा येथे आयोजित कार्यक्रमात दिला जानार आहे. सहकार क्षेत्रातील बॅक व पतसंस्थेला त्याच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे (या हेतुने बँको समिती मार्फत सदर पुरस्कार दिला जातो) सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या अविज पब्लिकेशन कोल्हापुर या संस्थेमार्फत हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अविज पब्लिकेशन कोल्हापुर हि संस्था सहकार क्षेत्रासाठी देश पातळीवर एक मार्गदर्शक संस्था म्हणुन काम करते. या संस्थेमार्फत विविध प्रकारच्या संस्थाची कामकाज पध्दती सहकार क्षेत्रातील कायदे त्या मध्ये वेळोवेळी होणारे बदल आधुनिक तंत्रज्ञान बाबतची अद्यावत माहिती संकलन व प्रसिध्दीचे कामकाज केले जाते. या संस्थेमार्फत प्रती वर्षी सहकार क्षेत्रात देशपातळीवर कार्यरत असणाऱ्या व उत्कृष्ठ कामकाज करणाऱ्या विविध प्रकारच्या सहकारी बँकाना तसेच सहकारी पतसंस्था कामकाज करणाऱ्या संस्थासाठी पुरस्कार प्रदान केले जातात.
वसमत शहरातील तसेच तालुक्यासह जिल्ह्यातील नाव लोकीक असणारी व आपल्या स्वच्छे काम काजासाठी प्रसिध्द असणारी जगद्गुरू तुकाराम नागरी सहकारी पतसंस्थेला त्यांच्या उत्कृष्ठ कामगीरी साठी या पुर्वी पाचव्यांदा बँको पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आर्थिक निकषानुसार पतसंस्थेच्या एनपीए चे प्रमाण तसेच सीएसआर चे प्रमाण अदि निकषामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वसमत जि. हिंगाली पात्र ठरली असल्या कारणाने सन २०२४ या वर्षाचा बॅको ब्ल्यु रिबन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सुभाष नारायणराव भोपाळे यांनी समाधान व्यक्त करत पुरस्काराचे श्रेय संचालक, भागधारक, सभासद, हितचिंतक, ग्राहक, अधिकारी तसेच कर्मचारी यांना दिले आहे. नुकतेच संस्थेने ग्राहकांकरीता मोबाईल बँकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच भविष्यात ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे विविध प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे अभिवचन दिले आहे.