
वसमत /
वसमत तालुक्यातील आसेगाव जवळच पिकप व बैलगाडीचा भिषण अपघातात झाल यात एक जण ठार झाले तर बैल दगावला आहे व यात दोन जण जखमी झाले आहेत.
या बाबत माहिती अशी की आसेगाव येथील चतुरमुखी विद्यालय येथील सेवक पंडितराव भाऊराव मुळे वय 50 वर्षे हे आज सुट्टी निमित्त शेतातून चारा आणण्यासाठी जात असताना कोंबड्या घेऊन भरधाव वेगान जाणारा पिकप क्र.MH 26 CH 1654 या ने बैलगाडीला जोरदार धडक दिली यात पंडितराव मुळे यांच जागीच मृत्यू झाला तर गाडीला बैल सुध्दा दगावला आहे.याच अपघातात पंडितराव मुळे यांच्या सोबत असलेले बळीराम हिरामन गछे वय 50,विकास पडीत मुळे वय 30 हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशन चे सपोनी गजानन बोराटे ,पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डक,पोलीस कर्मचारी साहेब चव्हाण,आडे,विभुते सह पोलीस कर्मचारी दाखल झाले. व जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
तर या अपघाताने आसेगाव रोडवर वाहनाचा रांगा लागल्या होत्या यावेळेस ग्रामीण पोलीसानी अपघातग्रस्त वाहने बाजुला करून वाहतुक सुरूळीत केली
छाया नागेश चव्हाण वसमत