आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

वसमत येथे जरांगे पाटलांच्या सभेच्या निमंत्रण मूळ पत्रिकेचे बॅड लावुन होणार वाटप

रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण

क्रांतीसुर्य मराठा योद्धा मनोज दादा जरांगे यांची 7/12/2023 रोजी दिग्रस कराळे पाटील येथे अतिविराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी हिंगोली जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात येत असून लाखोंच्या संख्येने समुदाय या सभेसाठी जमणार आहे
वसमत शहरातही या सभेसाठी जाण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
वसमत शहर पेठीतील तरुणांनी सभेसाठी मूळ पत्रिका छापली असून या मूळ पत्रिकेचे वाटप 5 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून बँड लावून हे मूळ पत्रिका घरोघर वाटप करण्यात येणार आहे. तसेच ही मूळ पत्रिका देऊन सभेसाठी येण्याचे आवाहनही सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिली घटना असेल की सभेसाठी सुद्धा मूळ पत्रिका छापण्यात आली आहे. जवळपास सात हजार मूळ पत्रिकेचे वाटप यावेळी करण्यात येणार आहे
या मूळ पत्रिकेचे वाटप सकल मराठा समाज वसमत शहराच्या वतीने घरोघरी जाऊन करण्यात येणार आहे यासाठी वसमत शहरातील सकल मराठा समाज बांधव परिश्रम घेत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!