वसमत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात एका शेतकऱ्यावर अन्याय करत चक्क शेतकऱ्यालाच मयत दाखविण्याचा धक्कादायक प्रकार वसमत तालुका कृषी विभागाने केला होता याबाबत आज हिवाळी अधिवेशन मध्ये सदरील मुद्दा विधानसभेत आमदार राजुभैय्या नवघरे यांनी मांडून कृषी विभागाच्या घोडचुकीचा एका शेतकऱ्याला नाहक त्रास ,छळ,मानसिक त्रास सहन केला जात असल्याचा मुद्दा आज विधानसभेत मांडून वसमत तालुका कृषी विभागाचे वाभाडे काढले आहेत.
याबाबत विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केल्याने आता शासन काय ठोस भुमिका घेत ,यात जे कोणी दोषी आहेत त्या वरिष्ठ अधिकारी ,कार्यालय प्रमुख ,कर्मचा-यांवर कारवाई होईल का हे पहावे लागणार आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की वसमत तालुक्यातील हयातनगर येथील लाभार्थी शेतकरी कैलास मच्छींद्र पुरी यांनी 19 जुन 2022 रोजी नउ फनी पेरणी यंत्रासाठी ऑनलाइन अर्ज कृषी विभागाकडे दाखल केला होता व कृषी विभागाने सदरील अर्ज हा शेतकरी मयत असल्याचे रिमार्क टाकून बाद केला होता . याबाबत शेतकऱ्याने ऑनलाइन केलेल्या अर्जाबाबत माहिती घेतली असता सदरील अर्ज बाद झाल्याचे कळाल्यानंतर सदरील शेतकऱ्याने वारंवार वसमत तालुका कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे खेटा मारल्या पण मुजोर अधिकारी ना त्यांना जुमानत होते ना त्यांना कुठलेही दादा देत होते व ही सर्व हकीकत संबंधित लाभार्थी शेतकरी यांनी वारंवार कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सांगुन देखील मयत शेरा निघाला नाही.अखेर वैतागुन शेतकऱ्यांने 17 आॅक्टोबर रोजी लेखी तक्रार कृषी कार्यालय,व विद्यमान आमदार राजुभैया नवघरे यांना दिली व आमदार महोदयांनी दखल घेण्याची स्पष्ट सुचना दिली व तात्काळ लाभ देण्याचे कृषी कार्यालयास सुचित केले पण कृषी कार्यालयाने केवळ कागदोपत्री कार्यवाही संबंधित कृषी कर्मचारी यांच्यावर केली पण संबंधित लाभार्थी शेतकरी अजुनही या नउफणी पेरणी यंंत्राच्या योजनेपासून वंचित आहे.कृषी अधिकारी यांची फोनवर व प्रत्यक्ष भेट काही वर्तमानपत्राचे प्रतिनिधींनी व लाभार्थी शेतकरी यांनी 16 नोव्हेंबर रोजी भेट घेतली असता कृषी अधिकारी म्हणतात मी संबंधित कर्मचारी यांना नोटीस दिली व त्यांच्याकडे खुलासा मागवला आहे,मी त्यांना काय करु तुम्ही मला तीनदा तिनदा हे प्रश्र्न विचारु नका तुम्हाला मी काही माहीती देऊ शकत नाही मी माझ्या वरिष्ठांना सांगतो असे उर्मट भाषा कृषी अधिकारी वापरतात मग लाभार्थी शेतकरी हयात असताना त्याला मयत शेरा का टाकला व त्या संबंधित दोषी कर्मचारी यांच्याकडून तालुका कृषी अधिकारी खुलासा का लवकर घेत नाहीत? व संबंधित शेतकरी याला का वंचित ठेवले जाते याचे गौडबंगाल हिंगोलीच्या जिल्हा कृषी अधिकारी व कृषी अधिक्षक यांनी तालुका कृषी विभागाला विचारावे व लाभार्थी शेतकरी याला लाभ मिळवुन द्यावा अशी मागणी लाभार्थी शेतकरी कैलास पुरी यांनी केली होती .
यामुळे सदरील विधानसभेमध्ये आज आमदार राजू भैया नवघरे यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित करत अशा कितीतरी शेतकऱ्यांना या वंचितापासून काहीतरी थातूरमातूर त्रुटी मारून बाद करण्यात येते का असा सवाल उपस्थित होत आहे .
सदरील मुजोर अधिकारी यांच्यावर आता कारवाई होईल का हे पाहणे रंजक ठरणार असून जिवंत शेतकऱ्याला मयत दाखविण्याचा प्रताप तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने केला असून यावर आता काय कारवाई होईल हे पाहावे लागणार आहे.