वसमत येथे आज पासुन अखंड हरिनाम सप्ताह व संगीत तुलसी रामकथेचे आयोजन
रामु चव्हाण

*वसमत येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत तुळसी रामकथा दिनांक 29 डिसेंबर पासून सुरु होणार! *यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकाचे किर्तन व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन*
वसमत / रामू चव्हाण
वसमत येथील ( वसमत नांदेड रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंदिर गोशाळेच्या बाजुला कन्हेरगाव चौक येथील संत मारोती महाराज संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व संगीत राम कथेचं आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये राम कथेचे कथा वक्ते ह.भ.प.रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे यांच्या रसाळ वाणीतून दुपारी 1 ते 4 या वेळेत कथा होणार आहे.तर या मध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकाचे किर्तन होणार आहे.व त्याच बरोबर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे.हा सप्ताह अनेक मान्यवर मंडळींच्या सहकार्याने व संत मारोती महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन नियोजनातुन होत आहे.29 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते 8या वेळेत ह.भ.प.गुरूवर्य माउली महाराज मुडेकर,30 डिसेंबर रोजी रात्री 7 ते 9या वेळेत ह.भ.प.तुळशीदास महाराज नळदकर,31 डिसेंबर रोजी ह.भ.प.रामचंद्र महाराज सारंग रात्री 7ते9,1जानेवारी 2024 रोजी ह.भ.प.नामदेव महाराज लबडे पंढरपूरकर,यांचे 7 ते9,2 जानेवारी रोजी ह.भ.प.गुरुवर्य महादेव महाराज राउत बिडकर रात्री 7 ते9 ,3जानेवारीरोजी रात्री हभ.प.माऊली महाराज सिंदगीकर रात्री 7 ते9 ,4 जानेवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर,व 5 जानेवारी रोजी सकाळी काल्याचे किर्तन ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे सकाळी 11 ते 1 या वेळेत होईल.व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करुण सप्तहाची सांगता होईल या स्पताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन संत मारोती महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने या सप्ताहाच्या आयोजक यजमान मंडळी व संजयन समितीच्या वतीने करण्यात आले आहे