अंतरवाली सराटी येथे मनोज दादा जरांगे पाटील हे दिनांक 10 फेब्रुवारी पासून आमरण उपोषणास बसलेले आहेत शासनाने सगे सोयरे अध्यादेश काढून त्याचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी तसेच मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे याबाबत अमरन उपोषण सुरू केलेले आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून वसमत तालुक्यात दिनांक 24 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील प्रमुख मार्गांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे यामुळे सकाळी 10-30 ते दुपारी 1-00 या काळामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्यामुळे या रस्त्यांवरील वाहतूक या वेळेमध्ये बंद राहणार असल्याने यातून केवळ रुग्ण आणि शालेय विद्यार्थी परीक्षार्थी विद्यार्थी यांना सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे
24 तारखेला वसमत तालुक्यातील गावांमध्ये रास्तारोको आहे.त्यांची नावे
सह…वसमत – परभणी रोड,वसमत-आसेगाव-निळारोड,वसमत-मालेगाव,वसमत-कुरूंदा,वसमत-औंढा,वसमत-बाभुळगाव या मार्गावरील गावांच्या पाटीवर रास्ता रोको होणार असल्याने या प्रमुख मार्गावर वाहतुक काही वेळासाठी बंद राहणार आहे.
वसमत शहरातही होणार रास्ता रोको
या रास्ता रोकोत सहभागी होण्यासाठी वसमत शहरातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ हु.बहिर्जी चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन होणार असल्याने या ठिकाणाहून येणारी वाहतुक बंद राहणार आहे.