वसमत येथे श्री गुरुचरित्राचे 50 वे एकदिवसीय पारायण संपन्न !
वसमत / देव दयाळ
माघ कृष्ण प्रतिपदेच्या दिवशी तसेच श्री नरसिंह सरस्वती महाराज निजधाम गमन तिथी निमित्त वसमत येथील स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरुचरित्राचे पारायण आयोजित केले होते त्यास सेवेकरांद्वारे उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिसाद मिळाला.
गेल्या अनेक वर्षापासून स्वामी समर्थ केंद्र वसमत विविध अध्यात्मिक कार्यक्रमांद्वारे संस्कृतीचे संवर्धन करण्याची जबाबदारी पार पाडत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज श्री नरसिंह सरस्वती महाराज गमन तिथी निमित्त श्री गुरुचरित्राचे पारायण ठेवण्यात आले होते ज्यामध्ये महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. हिंगोली सह आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून सेवेसाठी सेवेकरी केंद्रावर दाखल होत असतात. श्री गुरुचरित्राचे पारायण सकाळी सहा वाजल्यापासून ते अडीच वाजेपर्यंत अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात पार पडले. सेवेकऱ्यांचे नियोजन आणि भक्तांच्या सुस्पष्ट आवाजामध्ये श्री गुरुचरित्राचे पारायण संपन्न झाले.
Back to top button
Don`t copy text!