
वसमत / रामु चव्हाण
वसमत येथे सामाजिक एकोप्याचे दर्शन घडुन आले .
वसमत येथे 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.दरवर्षी वसमत येथे हु.बहिर्जी मित्र मंडळाच्या वतीने भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येते.यात छत्रपती शिवाजी महाराज ,मावळे यांचा जिवंत देखावा यांची घोड्यावरून मिरवणूक,तसेच छ.शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा यांची मिरवणूक निघते.यासाठी वसमत येथे मुस्लिम समाज बांधव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकी दरम्यान शहरातील सर्वात मोठी मजीद मंगळवारा समितीच्या वतीने पाणी बिस्कीटचे वाटप करून वसमत येथे मुस्लिम समाजातील एकोप्याचे दर्शन घडून आले .
सर्वधर्म समभाव सामाजिक एकोपा अबाधित राहावा यासाठी सर्व मज्जिद कमिटीच्या व ईद -ए- मिल्लाप कमिटीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला .
या वेळी मो शेख अतिख पापुलर ईद ए मिलाप कमिटी अध्यक्ष,
मो.यूनूस पॉपुलर ( गूतेदार),शेख अलीमोंदिन अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी, श्रीकांत भुमरे सरपंच, फेरोज पठाण संपादक गौरव महाराष्ट्र, संजय साबणे ,मोहम्मद उमर भाई,
आधी सर्व समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.