वसमत /रामु चव्हाण
क्रांतीसुर्य मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे वसमत येथे बारा मार्च रोजी संवाद दौऱ्यानिमित्त मराठा समाजाशी संवाद साधणार आहे.

मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा क्रांतीसुर्य मनोज दादा जरांगे पाटील हे दिनांक 12 मार्च रोजी वसमत हिंगोली दौऱ्यावर येणार असून वसमत शहरातील कृष्णा गार्डन मंगल कार्यालय परभणी रोड वसमत येथे सकाळी 9 वाजता त्यांची संवाद बैठक आहे. यानिमित्त वसमत शहरा सह तालुक्यामध्ये जय्यत तयारी करण्यात आले असून या बैठकीसाठी जवळपास एक लाखाच्यावर मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. शहरातील जिंतूर फाटा येथून त्यांची भव्य मिरवणूक निघून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार करून या रॅलीला सुरुवात होणार आहे तसेच शहरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला ही पुष्पहार अर्पण करून परभणी रोड येथील कृष्णा मंगल कार्यालय येथे त्यांचे स्वागत आणि बैठकीच्या आयोजन करण्यात आले आहे यामध्ये मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण आणि सगे सोयऱ्याच्या कायद्यात रूपांतर करण्याबाबतच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी म्हणून दादा जरांगे पाटील हे वसमत दौऱ्यावर येत आहेत .त्यांच्या स्वागतासाठी वसमत तालुका सज्ज झाला असून ठीक ठिकाणी त्यांचे स्वागतही होणार असल्याची माहिती आहे त्यासाठी सकल मराठा समाज परिश्रम घेत आहेत आज शहरातील कृष्णा मंगल कार्यालय येथे बैठक घेण्यात आले असून यामध्ये हिंगोली येथे होत असलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा बहिष्कार टाकण्यात आला असून या कार्यक्रमाला कोणीही मराठा बांधव जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या आदेश मराठा बांधवांना देण्यात आले आहेत तसेच दिनांक 10 मार्च रोजी वसमत येथे होणाऱ्या कार्यक्रमाला ही न जाण्याचा निर्णय यावेळी मराठा समाजाने केला. तसेच राजकीय पुढार्यांना यापुढे गाव बंदी असल्याचे त्यांनी जाहीर केले यामुळे येणाऱ्या काळात मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय यावेळी सकल मराठा समाजाने घेतला आहे.
Back to top button
Don`t copy text!