आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी आजपासून सुरू झाली असून आज आदर्श आचार संहिता संपूर्ण देशभरामध्ये लागू करण्यात आली आहे सर्वच पक्ष हे आपापल्या पक्षाचे उमेदवार यांच्यासाठी प्रचारासाठी सभा घेत आहेत तसेच विविध पक्षाचे नेते विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन प्रचाराचा धडाका लावत आहेत. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून लोकसभा निवडणुकीच्या पहिले नारळ फोडण्याचा मान वसमत विधानसभेला म्हणजे हिंगोली लोकसभेला मिळाला असून सोमवारी 18 मार्च रोजी शिवसेना(उ बा ठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वसमत दौऱ्यावर येत असून परभणी रोडवरील कृष्णा मंगल कार्यालय परभणी रोड वसमत येथे सकाळी साडेदहा वाजता त्यांचे जाहीर सभा आहे .
या निमित्ताने आज वसमत येथे शिवसेना कार्यालयामध्ये शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली
यावेळी जिल्हा प्रमुख संदेश देशमुख , शिवसेना सह संपर्कप्रमुख सुनील भाऊ काळे, माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार,उपजिल्हाप्रमुख अनिल कदम,
तालुका प्रमुख डाॅ धोंडीराम पार्डीकर, शहर प्रमुख काशीनाथ भोसले ,युवा सेना जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती, युवती सेना जिल्हा संघटक डॉक्टर रेणुका पतंगे ,माजी नगरसेवक राजेश पवार,संभाजी बेले ,दिपक कुलथे,माऊली कदम, सागर चेपुरवार,परमेश्वर चव्हाण,नागेश बेंडके आदी उपस्थित होते.