आपला जिल्हाराजकीयसामाजिक

शिवसेना अल्पसंख्यांक शहरप्रमुख पदी एस के पाशा

रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अल्पसंख्यांक शहरप्रमुख पदी वसमत येथील सामाजिक कार्यकर्ते एस के पाशा यांची आज निवड करण्यात आली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक शहराध्यक्षपदी वसमत येथील सामाजिक कार्यकर्ते एस के पाशा हे गेली अनेक वर्षापासून शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत शिवसेनेचे विविध आंदोलने सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असतो .त्यांच्या कार्याची दखल घेत हिंगोली शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाप्रमुख अब्दुल्ला पठाण यांनी आज त्यांची अल्पसंख्यांक शहर प्रमुख पदी निवड केल्याचे पत्र शिवसेनेचे माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख ,शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुनील भाऊ काळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉक्टर धोंडीराम पार्डीकर ,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल रावजी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे नियुक्त पत्र देण्यात आले.
त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!