आपला जिल्हा

आनंद खरे यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत येथे विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत अभीष्टचिंतन

संपादक हरनामसिंग चव्हाण

आनंद खरे यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत येथे विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत अभीष्टचिंतन


वसमत:

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव खरे यांचा वाढदिवस आज वसमत येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. रिपब्लिकन सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ करवंदे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात राहुलभाऊ करवंदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आनंदराव खरे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांना दीर्घायुष्याच्या व भावी सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आनंदराव खरे यांनी सामाजिक क्षेत्रात, विशेषतः भ्रष्टाचार निर्मूलन मोहिमेत जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सातत्याने केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद असून, त्यांचा हा संघर्ष आगामी काळातही समाजाला दिशा देणारा ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
या स्नेहसोहळ्याला वसमत व हिंगोली जिल्ह्यातील विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठा मित्रपरिवार उपस्थित होता. कार्यक्रमात उपस्थित सर्व स्नेही व कार्यकर्त्यांनी आनंदराव खरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. शेवटी कार्यकर्त्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia