आपला जिल्हा

पळशी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक सलग ४० वर्षांपासून बिनविरोध! कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवा इतिहास

संपादक हरनामसिंग चव्हाण

पळशी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक सलग ४० वर्षांपासून बिनविरोध!
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवा इतिहास

वसमत (प्रतिनिधी):
तालुक्यातील पळशी येथील ‘विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म. पळशी’ (ता. वसमत जि. हिंगोली) संचालक मंडळ निवडणूक २०२६-२७ ते २०३१-३२ साठीची प्राप्त नामनिर्देशनपत्रांची यादी प्रसिद्ध झाली असून, यंदाही ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध पार पडली आहे. विशेष म्हणजे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी किशनराव बेंडे यांच्या खंबीर नेतृत्व, मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली या संस्थेने सलग ४० वर्षांपासून बिनविरोध राहण्याची आपली ऐतिहासिक परंपरा कायम ठेवली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी डी. एल. डुकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत यादीनुसार, १३ जागांसाठी एकूण १३ उमेदवारांचेच अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे पळशी विकास सोसायटीवर पुन्हा एकदा सर्वपक्षीय आणि सर्वसमावेशक पॅनेलची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ पुढीलप्रमाणे:
सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघ:
१. बेंडे बळीराम तातेराव
२. बेंडे तानाजी किशनराव
३. बेंडे गणेश संतोबा
४. डोंगरे लक्ष्मण गंगाराम
५. बेंडे विश्वनाथ रामभाऊ
६. डोंगरे प्रल्हाद ज्ञानोजी
७. बेंडे साहेबाराव रामजी
८. खराटे तुकाराम सिताराम
महिला राखीव मतदारसंघ:
९. बेंडे जयश्री तानाजी
१०. बेंडे सुनिता शामराव
इतर मागासवर्ग मतदारसंघ:
११. राऊत नारायण साहेबराव
अनु.जाती / अनु.जमाती मतदारसंघ:
१२. ढगे नवनाथ जानकिराम
वि.जा. / भ.ज. / विमाप्र मतदारसंघ:
१३. गिरी रामगिरी भिकागिरी
सहकार क्षेत्रात आदर्श पॅटर्न!
पळशी गावाने राजकीय हेवेदावे बाजूला सारून गेल्या ४० वर्षांपासून संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा जपली आहे. बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गावकऱ्यांनी याही वेळी एकीचे दर्शन घडवले. संस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल संचालक मंडळाचे आणि पळशी ग्रामस्थांचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!