आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! औंढा-वसमतच्या विकासाला नवी ऊर्जा; १३२ केव्ही ‘बाराशिव’ सब-स्टेशनच्या कामाची आ. नवघरे यांच्याकडून थेट जागेवर जाऊन पाहणी! कमी दाब आणि खंडित वीज पुरवठ्यापासून परिसरातील अनेक गावांना मिळणार कायमची मुक्ती!
संपादक: हरनामसिंग चव्हाण



आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!
औंढा-वसमतच्या विकासाला नवी ऊर्जा; १३२ केव्ही ‘बाराशिव’ सब-स्टेशनच्या कामाची आ. नवघरे यांच्याकडून थेट जागेवर जाऊन पाहणी!
कमी दाब आणि खंडित वीज पुरवठ्यापासून परिसरातील अनेक गावांना मिळणार कायमची मुक्ती!
वसमत CT NEWS
वसमत विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत असणारे कार्यसम्राट आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या दूरदृष्टीने आणि अविरत पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या टाकळखोपा (ता. औंढा नागनाथ) येथील १३२ केव्ही बाराशिव सब-स्टेशनच्या कामाची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. आ. नवघरे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला व हे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
⚡ कुरुंदा-हिंगोली लाईनवरून मिळणार वीज; ‘या’ गावांचा वीज प्रश्न मिटणार!
या अत्यंत महत्त्वपूर्ण उपकेंद्राला कुरुंदा–हिंगोली १३२ केव्ही लाईनवरून मुख्य वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे मतदारसंघातील खालील प्रमुख गावांसह संपूर्ण परिसराचा कायापालट होणार आहे:
जवळाबाजार
रूपूर-सालना
शिरड
शहापूर
औंढा नागनाथ
गुंडा
नहाद
विशेष तरतूद: भविष्यातील वाढती विजेची गरज आणि औद्योगिक-शेतीचा विस्तार लक्षात घेऊन या सब-स्टेशनमध्ये अतिरिक्त ३३ केव्ही फीडर्सचीही विशेष तरतूद करण्यात आली आहे.
🚜 शेती, व्यापार आणि उद्योगाला मिळणार मोठी चालना!
गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना कमी दाब (Low Voltage) आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, हे १३२ केव्ही बाराशिव सब-स्टेशन पूर्ण झाल्यानंतर या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. दर्जेदार व अखंडित वीजपुरवठ्यामुळे शेती पंप, स्थानिक उद्योग, व्यापार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला मोठी गती मिळणार आहे.
🎙️ “हा विकासाचा नवा अध्याय!” – आमदार राजूभैय्या नवघरे “१३२ केव्ही बाराशिव सब-स्टेशन हे औंढा–वसमतच्या विकासाचा एक नवा अध्याय ठरणार आहे. जनतेला मूलभूत सुविधा सक्षमपणे देणे हे माझे कर्तव्य आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहचवण्यासाठी माझा हा संघर्ष आणि पाठपुरावा यापुढेही असाच अविरत सुरू राहील.” — आमदार राजूभैय्या नवघरे
🎯 ‘विकासाची गती… जनतेची प्रगती!’
आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या या धडक पाहणीमुळे आणि कामाचा वेग वाढवण्याच्या सूचनेमुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, जनतेकडून त्यांच्या या जनहितैषी कार्याचे जोरदार स्वागत केले जात आहे. ‘आपलं वसमत, आपल्या हक्काचा माणूस’ ही ओळख आ. नवघरे यांनी या कामाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.



