वसमत शहरातील दोन तरुणांचा जिंतूर जवळील रस्त्यावर कार आणि मोटरसायकलचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मयूर रत्नाकर शहाणे व त्यांचा मित्र रितेश विष्णुपंत टाक हे दोघेजण आज वसमत येथुन छत्रपती संभाजी नगर येथे जिंतूर मार्गे जात असताना जिंतूरच्या जवळ त्यांच कार आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये मयूर रत्नाकर शहाणे रा.सुवर्णकार कॉलनी वसमत व रितेश विष्णुपंत टाक रा.शहर पेठ वसमत हे अपघातात जखमी झाले .यावेळी नागरिकांनी त्यांना जिंतूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले होते पण उपचारादरम्यान मयूर शहाणे यांचा मृत्यू झाला तर रितेश टाक याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिंतूर येथून परभणी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले जिंतूर येथून परभणी येथे जात असताना रस्त्यातच रितेश टाक यांची प्राणज्योत मालवली. याबाबत वसमत शहरात ही बातमी पसरताच सराफा व सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने संपूर्ण मार्केट बंद ठेवून तात्काळ जिंतूर येथे सर्व समाज बांधव पोहोचले असून सर्व वसमत शहरावर शोककळा पसरली आहे.