आपला जिल्हाक्राईम स्टोरीमहाराष्ट्र

वसमत येथे ATM मध्ये येत आहे जास्तीची रक्कम

मुख्य संपादक रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण

वसमत शहरातील एका एटीएम मधून एटीएम कार्डद्वारे पैसे काढताना जास्तीची रक्कम मिळत असल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की वसमत शहरातील देशपांडे पेट्रोल पंप या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम असून या एटीएम मधून एटीएम द्वारे रक्कम काढल्यानंतर जास्तीची रक्कम येत असल्याचा प्रकार घडला आहे याबाबत वसमत येथील एका सुजाण नागरिकांनी हा प्रकार संबंधित बँकेला कळवल्यामुळे मोठे नुकसान टाळण्याची माहिती आहे याबाबत वसमत शहरातील एक तरुण विनायक सातपुते हे एटीएम वर पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांनी एटीएम मधून जास्त पैसे आले त्याना या बाबत शंका आली त्यानंतर एका ग्राहकाने 2500 रू काढले तर त्यांना 2900 रू आले असे दोन तीन ग्राहकांना जास्तीची रक्कम मिळाले यावेळेस विनायक सातपुते यानी तात्काळ ही बाब बॅक शी कळवली व बँकेचे ATM कॅश भरणा करणा-या टिम ने येऊन सदरील ATM चे शटर बंद केले आहे.
या बाबत दिवसभरात किती जनांना किती पैसे जास्त निघाले हे मात्र कळु शकले नाही. एक सुजाण नागरिक विनायक सातपुते यांच्या सुचकतेमुळे बँकेचे आर्थिक नुकसान मात्र वाचले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!