आपला जिल्हा

वसमत पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाशराव ढोणे यांचे अपघाती निधन

वसमत पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाशराव ढोणे यांचे अपघाती निधन

*वसमत: हरणाम सिंग चव्हाण

वसमत पंचायत समितीचे माजी सभापती आणि लोकप्रिय आमदार राजुभैय्या नवघरे यांचे मामा *श्री. प्रकाशराव शेषराव ढोणे* (वय ६२ वर्ष) यांचे आज हृदयद्रावक अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यात आणि विशेषतः वसमत व पूर्णा परिसरात शोककळा पसरली आहे.
प्रकाशराव ढोणे यांनी आपल्या कार्यकाळात पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक लोककल्याणकारी कामे केली होती. सामाजिक क्षेत्रात त्यांनी नेहमीच अग्रगण्य राहून काम केले, ज्यामुळे त्यांनी जनसामान्यांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. एक मितभाषी आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आज त्यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनावर राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, आमदार राजुभैय्या नवघरे यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगात सर्वजण सहभागी झाले आहेत.
*अंत्यविधीची माहिती:*
स्व. प्रकाशराव ढोणे मामा यांच्या पार्थिवावर आज, *रविवार दिनांक ०३ मे २०२६* रोजी *सायंकाळी ५:३० वाजता* त्यांच्या मूळ गावी *पांगरा ढोणे (ता. पूर्णा, जि. परभणी)* येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!