आपला जिल्हा
दुःख बाजूला सारून आमदार राजूभैया नवघरे पुन्हा जनसेवेत; मामांच्या निधनानंतरही कर्तव्याला दिली प्राथमिकता
संपादक हरनामसिंग चव्हाण
दुःख बाजूला सारून आमदार राजूभैया नवघरे पुन्हा जनसेवेत; मामांच्या निधनानंतरही कर्तव्याला दिली प्राथमिकता

वसमत (संपादक ):हरनामसिंग चव्हाण
- “विसरून अश्रू दुःखाचे, कर्तव्य करू महत्त्वाचे” या उक्तीचा प्रत्यय आज वसमतमध्ये पाहायला मिळाला. लाडके आमदार राजूभैया नवघरे यांचे मामा आणि त्यांचे मार्गदर्शक प्रकाशराव ढोणे यांचे नुकतेच भीषण अपघातात निधन झाले. या दुःखद घटनेमुळे नवघरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही, आपल्या वैयक्तिक दुःखापेक्षा जनतेप्रती असलेले कर्तव्य मोठे मानून आमदार राजूभैया पुन्हा एकदा जनतेच्या सेवेत सक्रिय झाले आहेत.
मामांच्या निधनाचे दुःख मनात असतानाच, गुरुवारी (७ मे २०२६) ‘वसमतचा राजू’ म्हणून त्यांनी मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. आपल्या शब्दाला जागत आणि जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते जपण्यासाठी त्यांनी दिवसभरात अनेक विवाह सोहळे आणि उद्घाटन प्रसंगी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या.
आजचे दौरे आणि उपस्थिती:
आमदार नवघरे यांनी आज दिवसभरात खालील ठिकाणी भेटी देऊन नागरिकांच्या आनंदात सहभाग नोंदवला:
१) आंबा (ता. वसमत): कदम व भोसले परिवाराचा विवाह सोहळा.
२) पांगरा बोखारे: बोंगाने परिवाराचा विवाह सोहळा.
३) नांदखेडा: कदम परिवाराचा विवाह सोहळा.
४) पोटा बु.: लोणसने परिवाराचा विवाह सोहळा.
५) पार्डी खुर्द: साक्षगंध सोहळा.
६) कुरुंदा: भालेराव परिवाराचा विवाह सोहळा.
७) सातेफळ: रावले परिवाराचा विवाह सोहळा.
८) वसमत (काबरा कॉम्प्लेक्स): सातबारा ॲग्रो एजन्सीचा भव्य उद्घाटन सोहळा.
आपुलकीचे नाते सर्वप्रथम:
यावेळी बोलताना आमदार राजूभैया नवघरे म्हणाले की, “मामांचे जाणे ही माझ्यासाठी कधीही न भरून निघणारी हानी आहे, परंतु वसमतची जनता हेच माझे कुटुंब आहे. या कुटुंबाप्रती असलेले माझे कर्तव्य मी कोणत्याही परिस्थितीत थांबवणार नाही.”
घरातील वरिष्ठ व्यक्ती आणि मार्गदर्शक गमावल्यानंतरही, मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या सुखा-दुःखात धावून जाणाऱ्या आपल्या आमदाराच्या या ‘कर्तव्यनिष्ठेचे’ सध्या संपूर्ण वसमत तालुक्यात कौतुक होत आहे.
“आपलं वसमत, आपला राजु!”