अर्थकारणआपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

मा. आमदार राजूभैया नवघरे यांच्याकडून आरोग्यमंत्र्यांची भेट; साळणा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीची मागणी, तर बाबुळगावसाठी पदनिर्मिती केल्याबद्दल मानले आभार!

संपादक हरनामसिंग चव्हाण

मा. आमदार राजूभैया नवघरे यांच्याकडून आरोग्यमंत्र्यांची भेट; साळणा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीची मागणी, तर बाबुळगावसाठी पदनिर्मिती केल्याबद्दल मानले आभार!

वसमत CT NEWS

वसमत ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट व सक्षम करण्यासाठी वसमत विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मा. श्री. राजूभैया नवघरे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आरोग्य मंत्री मा. श्री. प्रकाशजी आबिटकर साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मतदारसंघातील आरोग्यविषयक महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन आरोग्यमंत्र्यांना सादर केले.
साळणा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी:
औंढा नागनाथ तालुक्यातील साळणा आणि परिसरातील नागरिकांना तातडीच्या आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी साळणा येथे नवीन प्रस्तावित ‘प्राथमिक आरोग्य केंद्रास’ (PHC) त्वरित प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार राजूभैया नवघरे यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली. साळणा येथे आरोग्य केंद्र झाल्यास परिसरातील हजारो ग्रामस्थांची आरोग्यविषयक गैरसोय दूर होणार आहे.
बाबुळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निर्णयाबद्दल आभार:
दुसरीकडे, वसमत तालुक्यातील बाबुळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासनाने नवीन पदनिर्मिती जाहीर करून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला मोठी ताकद दिली आहे. ग्रामीण जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारा हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल आमदार नवघरे यांनी आरोग्यमंत्री मा. श्री. प्रकाशजी आबिटकर साहेब यांचे मतदारसंघातील जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.
“मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आणि दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवणे हे आपले मुख्य ध्येय आहे. साळणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि मतदारसंघातील आरोग्य सुविधांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी माझे प्रयत्न अविरत सुरू राहतील.”
–मा. आमदार राजूभैया नवघरे
(वसमत विधानसभा मतदारसंघ)

या महत्त्वपूर्ण भेटीमुळे साळणा परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली असून, आमदार राजूभैया नवघरे यांच्या या पाठपुराव्याबद्दल मतदारसंघातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!