आपला जिल्हा

साई अपार्टमेंट ते नांदेड – परभणी पर्यंत रोड संलग्न करावे पूर्णा पाठबंधारे सहकारी कर्मचारी गृह निर्माण संस्था म वसमत यांचे निवेदन

मुख्य संपादक रामू चव्हाण

साई अपार्टमेंट ते नांदेड – परभणी पर्यंत रोड संलग्न करावे
पूर्णा पाठबंधारे सहकारी कर्मचारी गृह निर्माण संस्था म वसमत यांचे निवेदन

वसमत
आसेगाव रोडलगत साई अपार्टमेट ते पुर्णा पाठबंधारे सहकारी कर्मचारी वसाहतीतुन नांदेड – परभणी मेन रोडला मिळणारा 80 फुट रुंदीच्या आर सी सी रोडचे काम अर्धवट करण्यात आले आहे.सदावर्ते यांच्या घरापासून ते नांदेड – परभणी मेन रोडपर्यंत संलग्न करण्यासाठी मुख्याधिकारी श्री आशुतोष चिंचाळकर यांना पूर्णा प्रकल्प सहकारी कर्मचारी गृहनिर्माण संस्था मर्यादित वसमतच्या वतीने निवेदन देण्यात आले.
साई अपार्टमेंट आसेगाव रोड ते गणेश नगर, शांताई नगर, रवींद्रनाथ टागोर कॉलनी, पूर्णा पाठबंधारे सहकारी कर्मचारी गृहनिर्माण संस्था, पूर्णा स. सा. कारखाना कर्मचारी सोसायटी, तिरुपती नगर व इतर राहवाशी सोसायट्या या रोडला जोडल्यागेलेल्या आहेत. रुंदी 80 फुटाच्या रोडचे मागील वर्षी पहिल्या टप्प्यात गणेश नगर ते सदावर्ते यांच्या घरापर्यंत सी सी रोडचे अर्धवट व दुसऱ्या साईडचे अर्धवट काम झाले आहे.
दुसरा टप्पाचे सी सी रोडचे काम सुरु केले आहे. घिके सर यांच्या घराच्या साईडला अर्धवट राहिलेले काम होत आहे. पुढील
सदावर्ते यांच्या घरापासून ते नांदेड रोड पर्यंतचे काम अपूर्ण अवस्थेत आहे.
सदावर्ते यांच्या घरा समोरील पुढच्या बाजूचे 40 फुटाचे रोडचे प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याचे कारण दाखवून रस्त्याचे काम रखडले गेले आहे. न्यायप्रविषय 40 फुट रस्ता सोडता उर्वरित 40 फूट रस्ता रिकामाच आहे (म्हणजे म्हणजे सदावर्ते यांचे घर ते नांदेड रोड)
या भागात प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालय, इंग्लिश स्कूल आहेत वसाहतीत लहान लहान मुलं दैनंदिन स्कुल बस मार्फत शाळेत जातात तसेच या रोडवरूनच बांधकामाकरिता हायवा व इतर अवजड वाहने ये जा करतात हा रोड अत्यंत महत्वाचा व रहदारीसाठी वापरला मुख्य रस्ता असल्यामुळे
सदावर्ते यांच्या घरापासून ते नांदेड रोड अंदाजे ( 40 × 100 फूट ) पर्यंत सदर सि. सि रोड संलग्न करण्यात यावा या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर सोसायटीचे अध्यक्ष भिमराव कागणे काका, सचिव ऍड. सचिन जोशी, संचालक प्रदीप गुंडाळे, बालासाहेब तेलंग, पांडुरंग औठे सर, चंद्रकांत चहाड,प्रमोद कुलकर्णी, मधुसूदन काटे काका, अनिल कबाडे, शिवाजी विरकर, शिवाजी दगडे, नागनाथ बेंडके व इतर सभासदांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!